भाऊसाहेब पाटणकर

उपमा तव वदनाला त्याची मी ही दिली असती सुखे
थोडेही जर त्याला येते लाजता तुज सारखे
---
जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कुणीतरी
किर्तने सारीकडे ..सारीकडे ज्ञानेश्वरी
काळ्जी आमच्या हिताची एवढी घेवू नका
जावू सुखे नरकात तेथे तरी येवू नका.
---
भास्करा आम्हा दयाही येते तुझी अधिमधी
पाहिली आहेस का रे रात्र प्रणयाची कधी?
आम्हासही या शायराची मग कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते!!
---
दोस्तहो दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला 
येऊनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला 

हाय हे वास्तव्य माझे सर्वास कळले शेवटी 
सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी 

Comments

Popular posts from this blog

आफरीन आफरीन

रे मीता